Thursday, February 24, 2011

डावपेच : शुटिंग शुटिंग












डावपेच : शुटिंग शुटिंग


shooting of marathi movie daavpech

डावपेच : गाण्याचं शुटिंग















डावपेच : गाण्याचं शुटिंग
making of love song of marathi movie davpech

डावपेच : ऑन लोकेशन

डावपेच : ऑन लोकेशन
२५ फेब्रुवारीला रिलीज होतोय










अतुल कुलकर्णीचं फार्म हाउस


अतुल कुलकर्णी ग्लॅमरस दुनियेत असूनही कलेचं आणि सामाजिक भान राखणारा कलावंत. त्यानं साताऱ्याजवळच्या एका गावात ओसाड असलेली जमीन घेतली आणि तिथं जंगल फुलवलंय. तिथली 'इको सिस्टीम' जपली आहे. यशाच्या शिखरावर असतानाही सामाजिक जाणिवा जिवंत असल्याचं यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कोणतं असेल! साताराजवळच्या वानकुसवडे गावातील तब्बल २४ एकर ओसाड जागा नैसगिर्क पद्धतीनं हरित करण्याचं काम त्यानं हाती घेतलंय.

याबाबत अतुल 'मटा'ला सांगतो, 'खूप पूर्वी मी कुर्ग इथं चक्क जंगल डेव्हलप करणाऱ्या एका फॅमिलीबद्दल वाचलं होतं. निसर्गाच्या संवर्धनासाठी केवळ सरकारवर विसंबून न राहता आपणही जमेल तितके प्रयत्न करू या अशा हेतूनं त्यांनी स्वबळावर वनीकरणाचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांनी मलाही इनस्पायर केलं. उगाच लोणावळा-खंडाळ्यात जमीन विकत घेण्यापेक्षा आपणही असंच काही तरी करावं, असं मला वाटू लागलं. त्यातूनच जमीन घ्यायचं ठरवलं.'

अतुल, त्याची तीन आतेभावंडं आणि मित्रांनी मिळून वानकुसवड्यात २४ एकर जागा विकत घेतली. पुण्यात 'ओकियॉस' या संस्थेकडे रिस्टोरेशनसाठी दिली. केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या दोघी ही संस्था चालवतात. जमिनीचं, तिथल्या निसर्गचक्राचं निरीक्षण करून तिचं परत पुनरुज्जीवन करण्याचं महत्त्वाचं काम या दोघी करतात. २००४ मध्ये त्यानं ही जमीन विकत घेतली, तेव्हा तिथे अक्षरश: साधं गवतही नव्हतं. पूर्णत: कोरडी आणि धूप झालेली ती जमीन होती.

अतुल म्हणाला, 'या जमिनीचं काम सुरू केलं खरं; पण ते डोळ्यांना दिसेपर्यंत बराच कालावधी जावा लागला. आता कुठे म्हणजे तब्बल सहा वर्षांनतर तिथं हिरवाई दिसू लागलीय. खूपच पेशन्सचं काम आहे हे. तिथली 'इको सिस्टीम' नैसगिर्क रीतीनं रिस्टोअर करण्याचं काम अर्थातच झट की पट होण्यातलं नव्हतं. आताशा चांगली परिस्थिती आहे. हजार-बाराशे झाडं लावली आहेत. एक छोटं घरही बांधलं आहे.' कामाच्या स्वरूपामुळे अतुलला तिकडं सतत जाणं जमत नाही; पण तीन-चार महिन्यांतून एकदा तरी तिकडं जायला त्याला आवडतं. 'या जागी घनदाट जंगल व्हायला कित्येक वर्षं जावी लागतील. त्याचा फायदा आपल्याला नाही, तर किमान पुढच्या जनरेशनला तरी होईलच. एरवी आपण प्रत्यक्ष झाडं तोडत नसलो, तरी कुठं ना कुठंतरी त्यांच्या तोडीस जबाबदार असतोच. त्यामुळे काही जणांनी एकत्र येऊन स्वत:च अशा प्रकारे वनीकरण करण्याचं हे मॉडेल विकसित व्हावं, असं मला वाटतं. मुख्य म्हणजे ते नक्कीच मॅनेजेबल आहे.'

.... करामत 'ओकियॉस'ची

ओकियॉस वेब-साईटला भेट द्या

Ketaki Ghate n Manasi Karandikar
'ओकियॉस' संस्थेच्या मानसी आणि केतकीसाठी वानकुसवड्याच्या जमिनीचं रिस्टोरेशनचं काम नवं नसलं, तरी ते नक्कीच चॅलेंजिंग होतं. जमिनीचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा, तिथं उगवू शकणाऱ्या झाडाझुडपांचा त्यांनी वर्षभर अभ्यास केला. प्रत्येक ऋतूनुसार जमिनीचं निरीक्षण करून सव्हेर् केला आणि मगच कामाला सुरुवात केली. केतकी सांगते, 'जमिनीवर उगवणाऱ्या गवताला, झाडांना संरक्षण पुरवण्याचं काम आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. तिथं गुरांचा खूप वावर असल्यानं ते सगळी झाडंझुडपं खाऊन टाकायचे. शिवाय आम्हाला त्या जागेभोवती जैविक कुंपणच उभारायचं होतं.' मानसी म्हणाली, 'एकूणच काम करताना आमचा स्थानिक वनस्पतींवर भर होता. आजकाल अनेक जण अशा जमिनी विकत घेतात आणि त्यावर जेसीबी फिरवून गुलमोहर, नीलमोहर अशी शहरी झाडं लावतात. ते टाळून त्या जागी उंबर, जांभूळ, हिरडा, आंबा अशी १३० जातींची सुमारे ११०० झाडे आम्ही लावली. जमीन नुसतीच हिरवी करण्यापेक्षा तिथं वर्षांनुवषेर् चालत आलेली 'इको सिस्टीम' आम्हाला पुनरुज्जीवित करायची होती.'

सर्वांच्या प्रयत्नांना यश यायला चार वर्षे जावी लागली. एके काळी ज्या जागेत गवतही नव्हतं, तिथं आता बऱ्यापैकी हिरवाई दिसू लागली आहे. पक्षीही येऊ लागले आहेत, जे 'इको सिस्टीम' सुधारत असल्याचा इंडिकेटर आहेत. अजूनही झाडं, स्थानिक वनस्पती, गवत, औषधी वनस्पती, सुपीक माती अशी परिपूर्ण इको सिस्टीम तयार व्हायला किमान वीस वर्षे जावी लागतील. अशा प्रकारच्या रिस्टोरेशनची पश्चिम घाटांना खूप गरज असल्याचं मत केतकी-मानसीनं व्यक्त केलं.

कीर्ती परचुरे । पुणे

Wednesday, February 23, 2011

हमिदाबाईची कोठी


अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ या नावाने पाच जुन्या कलाकृती रंगमंचावर आणून त्यांचे प्रत्येकी 25 प्रयोग करणार, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली आहे. यातील ‘सूर्याची पिल्ले’ आणि ‘लहानपण देगा देवा’ ही दोन नाटके नव्या संचात रंगभूमीवर आली आणि त्यांना जोरदार यशही मिळाले. अनिल बर्वेलिखित ‘हमिदाबाईची कोठी’ हे या मालिकेतील तिसरे नाटक ‘लहानपण देगा देवा’च्या पंचविसाव्या प्रयोगानंतर प्रेक्षकांसमोर याबाबत घोषणा होईल, असे कळते. एका वेश्येच्या जीवनावर आधारित हे नाटक 1979  मध्ये उदय धुरत यांच्या ‘माऊली प्रॉडक्शन’ने रंगमंचावर आणले होते. विजया मेहता दिग्दर्शित या नाटकातून नाना पाटेकरांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अत्यंत गाजलेल्या या नाटकात नीना कुलकर्णीही होत्या. त्याचे 250  प्रयोग झाले होते. 


ते चंद्रकात कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली नव्याने आणण्यासाठी सुनील बर्वे यांनी रिहर्सलही सुरू केली असून अनिल बर्वे यांच्या पत्नी प्रेरणा यांच्याकडून रीतसर हक्क घेऊनच हे नाटक करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘उदय धुरत यांनी अनेक वर्ष ते नाटक केलेले नाही. त्यांच्याकडे नेमके कोणते हक्क आहेत, हे  ठाऊक नाही. पण हे प्रकरण सामोपचाराने सोडवायचे आहे. धुरत यांना भेटून त्यांची समजूत घालू,’’ असेही बर्वे म्हणाले. दुसरीकडे धुरत म्हणतात की, ‘‘हमिदाबाईची कोठी’चे हक्क तहहयात माझ्याकडे आहेत. नाटक रंगभूमीवर आले तेव्हाच लेखक अनिल बर्वे यांच्याकडून मी ते घेतले आहेत. त्यांना नाटकाचा पेन मनीही दिला आहे. तो दिल्यावर नाटक निर्मात्याचे होते. त्यामुळे दुसरा कुणी निर्माता हे नाटक करत असल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ.’ 


कॉपीराइट कायद्यानुसार एखाद्या निर्मात्याने पाच वर्षे नाटकाचे प्रयोग केले नसतील, तर नाटककार ते दुस-या निर्मात्याला देऊ शकतो. परंतु हा कायदा 1995 मध्ये आल्याने त्यापूर्वीच्या आलेल्या नाटकांना लागू होत नाही. त्यामुळे ‘हमीदाबाईची कोठी’ या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. याच मुद्दय़ावर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे लेखक प्रदीप दळवी यांच्याविरोधात खटला जिंकला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.

खेळ मांडला

विजू मानेच्या आगामी 'खेळ मांडला' या सिनेमामध्ये रक्ताच्या नात्यापलिकडचं बाप-लेकीचं प्रेमळ नातं दिसेल. या सिनेमात बापाकडे असलेली मुलगी बहिरी, आंधळी आणि मुकी असेल. विशेष म्हणजे ही गोष्ट साकारली जाईल ती कठपुतळ्यांच्या कॅनव्हासवर.

' कठपुतळ्यांचे खेळ करून आपलं पोट भरणारा एक तरुण मुंबईच्या आकर्षणाने या मायानगरीत येतो. सुरुवातीला त्याला इथलं वातावरण झेपत नाही. काही दिवसांत त्याच्या लक्षात येतं की कठपुतळ्या नाचवण्याची कलाच या शहरात आपल्याला तारेल, त्यातून तो मुंबईत खेळ सुरू करतो. या दरम्यानच त्याला ही आंधळी, मुकी-बहिरी मुलगी दिसते,' विजू सांगतो.

उभं आयुष्य धागे लावलेल्या बाहुल्यांबरोबर घालवणाऱ्या या 'बापा'लाही ही आंधळी-बहिरी मुलगी कठपुतळीच्या बाहुलीसारखीच दिसू लागते. त्यानंतर या खेळाचा उपयोग करून तो तिला मोठं करायचं ठरवतो. त्या मुलीला खेळात सहभागी करून घेऊन त्या खेळात नवं इनोव्हेशन घडवतो, अशी माहितीही विजूने दिली. या सिनेमात मंगेश देसाई, उदय सबनीस यांसोबत अनन्या देवरे ही पुण्याची बालकलाकार दिसेल. मुंबई-पुण्यात ऑडिशन्स घेतल्यावर अनन्याची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली. तिनेही यात कल्पनेपलिकडचा अभिनय केल्याचं दिग्दर्शक सांगतो. हा सिनेमा सप्टेंबर अखेरीस प्रदशिर्त होईल.

Tuesday, February 22, 2011

नविन मराठी नाटक रिंग रिंग रंगा



नविन मराठी नाटक रिंग रिंग रंगा या महीन्यात येतयं. रिंग रिंग रंगा हे दोन जिवलग मित्र श्रीरंग आणि तानाजी वर आधारीत फार्सिकल कॉमेडी नाटक आहे.


पटकथा: भगवान पाचोरे
दिग्दर्शक: भिमराव मुडे
संगित: रोहन प्रधान
प्रकाशयोजना: शितल तळपदे
निर्माता: विनीत दादरकर
कलाकार:
प्रदीप पटवर्धन
शेखर फडके
मौसमी तोंडवळकर
संग्राम साळवी
गौरी महाजन
संदिप तटकरे
आशिष राणे
शिल्पा कांबळे

सारिका निलाटकर-नवाथे परत येतेय


’जास्वंदी' या आगामी नाटकामधली मुख्य अभिनेत्री आहे, सारिका निलाटकर-नवाथे. ही अभिनेत्री म्हणजे केबीसीतल्या त्या पहिल्या करोडपतीची बायको आहे. २००७ मध्ये सारिकाने हर्षवर्धन नवाथेशी लग्न केलं. सारिका मूळ नागपूरची. तिकडे बऱ्याच नाटकात काम केल्यावर ती मुंबईत दाखल झाली. छोट्या पडद्यावर तिने एण्ट्री घेतली ती 'हल्लागुल्ला'ची अँकर म्हणून. तिच्याही करिअरला 'अवंतिका' मधल्या 'मैथिली'ने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'वंश', 'सात जन्माची कहाणी' या सीरिअल्स, 'मुन्नाभाई एसएससी', 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर' सारखे सिनेमेही केले. आता ती 'जास्वंदी' मधून पुन्हा रंगमंचावर येतेय. 'केबीसी'मुळे प्रकाशात आलेलं नवाथे हे आडनाव सारिकाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा प्रकाशात येईल.

हर्षवर्धन नवाथेही सध्या एका मोठ्या एनजीओचा सीओओ आहे. हर्षवर्धन म्हणतो, '२००० मध्ये मला त्या क्विझमुळे एकदम ग्लॅमर, एक्स्पोजर मिळालं. पण माझे पाय पूर्ण जमिनीवर होते. हा फोकस खूप कमी काळासाठी माझ्यावर असेल हे मी जाणून होतो. त्यावेळी मला आयएएस व्हायचं होतं. 'केबीसी'मुळे आणि त्यानंतरच्या माझ्या हेक्टिक शेड्युलमुळे अभ्यासात खंड पडला. ते स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर मी इंग्लंडमधून एमबीए केलं आणि 'नांदी' या एनजीओच्या रुपाने मला मनासारखं काम गवसलं, हर्षवर्धन सांगतो. सध्या 'नांदी कम्युनिटी वॉटर सव्हिर्सेस' या कंपनीचा तो सीओओ म्हणून जबाबदारी सांभाळतोय.

Monday, February 21, 2011

'तूच खरी घरची लक्ष्मी’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण


सुदत्त फिल्मस्‌ बॅनर अंतर्गत हर्षल भदाणे निर्मित आणि विजय भानू दिग्दर्शित ’तूच खरी घरची लक्ष्मी’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चंद्रकलासारखा तमाशाप्रधान चित्रपट निर्माण केल्यानंतर एका संवेदनशील चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न भदाणे यांनी केला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या चित्रिकरण सत्राप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर विशेषत्वाने उपस्थित होते.

घराण्याला वंशज म्हणून मुलगाच हवा मुलगी नको असे मानणार्‍या कुटुंबांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. मुलाची अपेक्षा करण्यार्‍या घरातील बाईच्या पोटात जर मुलीचा गर्भ असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळले तर गर्भपात करण्याचा सल्ला त्या होणार्‍या आईला दिला जातो. तीने तरीही मुलीला जन्म दिलाच तर तीने जणू काही मोठा अपराध केलाय, मोठे पाप केलेयं अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. सरकारने सोनोग्राफी आणि गर्भपातावर कायद्याने बंदी आणली असली तरीही काही ठिकाणी सोनोग्राफी करून गर्भपात केला जातो. या चित्रपटात हेच ठळकपणे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद बाबूराव बोरगांवकर यांचे असून, जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना अच्युत ठाकूर यांनी संगीत दिलेले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत सुनिल बर्वे, तेजा देवकर, आदिती सारंगधर, शरद पोंक्षे, रविंद्र बेर्डे, सुशांत शेलार, अंजली जोशी, आणि असित रेडीज.

जगण्यात मजा आहे



संगीतकार यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या 'जगण्यात मजा आहे' या मराठी रोमॅन्टिक गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते आणि संगीतकार यशवंत देव व सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, संगीतकार नंदू होनप, चित्रपट निर्माते अतुल काळे, सुमीत कॅसेटचे सुभाष परदेशी, ख्यातनाम गायक अरुण दाते, बुजुर्ग संगीतकार प्रभाकर जोग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला.

मोघे म्हणाले, 'महाराष्ट्रात भावसंगीताची मोठी परंपरा आहे. चांगले काव्य हे लोकप्रिय होतेच, असे नाही आणि लोकप्रिय असलेली गाणी तीही चांगल्याच काव्य प्रकारात मोडतातच असेही नाही. प्रत्येक काव्याचे, त्याला लावलेल्या चालीचे एक नशीब असते. गाणे आणि काव्य ही एक कला असल्याने ती अपूर्ण असणारच. पण गायकांनी ही कला समजून घेऊन त्या काव्याचा अर्श समजून घेऊन काव्य गायले तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला परिणाम होईल.'

या सोहळ्यात अल्बममधली काही गीते जीतेंद्र अभ्यंकर आणि स्वरजा लेले यांनी साद्र केली. या अल्बमसाठी गीत लेखन केलेले कवी - गीतकार राजन लाखे, सुमीतचे सुभाष परदेशी हेही या सोहळ्यास उपस्थित होते.

'जगण्यात मजा आहे' या अल्बमम्ध्ये एकूण ८ गाणी आहेत. यातली गीतरचना राजन लाखे यांची असून त्यांना यशवंत देव यांनी संगीत दिलं आहे.

Sunday, February 20, 2011

तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलसं गाव


'तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलसं गाव’ या अल्बमचं प्रकाशन सुरेश वाडकर आणि स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते झालं. या अल्बममध्ये एकच गाणे असून ते २१ कडव्यांचे आणि तब्बल ३६ मिनिटांचे आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि गायन मिलिंद इंगळे यांनी केले आहे.

या गाण्याबद्दल माहिती देताना मिलिंद इंगळे म्हणाले की, ‘सांज गारवा’नंतर मी एकही अल्बम केला नव्हता. काही तरी वेगळे करण्याची इच्छा होती. नागपूर येथील कवी ज्ञानेश वाकूडकर यांच्या कवितांचे ‘सखी सजणी’ हे पुस्तक हाती आले. त्यातून आठ वेगळी गाणी करणे शक्यच नव्हते. मग त्यातील मला आवडलेल्या २१ कडव्यांचे गाणे तयार करण्याचे ठरविले. प्रत्येक कडव्यात प्रियकराने आपल्या प्रेयसीचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे एक सलग गाणे करायचे ठरवले. त्यातून हे २१ कडव्यांचे आणि ३६ मिनिटांचे गाणे तयार झाले.

एवढे सलग गाणे ऐकण्याची श्रोत्यांना सवय नसते. त्यामुळे या प्रयोगाचा ते स्वीकार करतील का?, यावर मिलिंद म्हणाले की, या गाण्यातील प्रत्येक कडव्याची चाल वेगवेगळी आहे. सामान्यपणे सीडीमधील दोन गाण्यांमध्ये असलेला काही सेकंदांचा ‘ब्लँक पॉझ’ न वापरता दोन कडव्यांना जोडणारे संगीत वापरले आहे. यात अरेबियन शैलीपासून ते लावणीपर्यंत आणि पारंपरिक भारतीय वाद्यांपासून आफ्रिकन वाद्यांपर्यंत विविध सांगीतिक प्रकारांचा वापर करण्यात आला आहे. या गाण्याच्या सीडीबरोबर त्याचे शब्द असलेली पुस्तिकाही देण्यात येणार आहे.

खासगी म्युझिक अल्बमबद्दल माहिती देताना त्याने सांगितले की, ‘गारवा’च्या सुमारे सात-आठ लाख सीडींची विक्री झाली होती. अलीकडे मात्र पायरसीमुळे या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या या उद्योगाला कॉर्पोरेट्सच्या मदतीची गरज आहे.

फोटो पहा....

प्रिया बापट-उमेश कामत एन्गेज्ड

प्रिया बापट-उमेश कामत या दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासुन सुरू होती. अनेक पार्ट्यांमध्ये, एकमेकांच्या सेटवर अनेकांनी त्या दोघांना एकत्र पाहिलंय. पण नुकत्याच झालेल्या व्हॅलेण्टाइन्स डे नंतर मात्र त्यांना आपलं हे नातं जाहीर करावं असं वाटायला लागलं आणि त्यांनी आपल्या जस्ट फेंडशीपवर 'एन्गेज्ड' असा स्टॅम्प मारला. आता हे स्टेट्स मॅरीड कधी होतंय हे बघायचयं.

Thursday, February 17, 2011

झी गौरव पुरस्कार २०११


गुडनाईट प्रस्तुत 'झी गौरव' पुरस्कार २०११ साठीची नामांकने ’ग्रॅड हयात’ ह्या पंचतारांकित हॉटेल मधे जाहिर करण्यात आली.

'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाने एकूण १३ नामांकने पटकावून बाजी मारली. तसेच व्यवसायिक नाटकांमध्ये 'नवा गडी नवं राज्य' ने सर्वाधिक म्हणजे आठ नामांकने मिळवली आहेत.

स्पर्धेत 'मी मन आणि ध्रुव', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'मुंबई पुणे मुंबई' तसेच 'पारध' हे चित्रपट तर व्यवसायिक नाटकांमध्ये 'वा गुरु', 'काटकोन त्रिकोण', 'कथा', 'काय डेंजर वारा सुटलाय' आणि 'मीटर डाऊन' आहेत.

प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धेत 'पुनःश्च हनिमून' सात नामांकनासह आघाडीवर आहे तर 'जा खेळायला पळ', 'रात्रंदिन आम्हा', 'तिची सतरा प्रकरणे' या नाटकांनी प्रत्येकी सहा नामांकने मिळवली आहेत.

या पुरस्कारासाठी जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१० पर्यंतच्या कालावधीत प्रदर्शित झालेले चित्रपट आणि नाटक यांचा विचार करण्यात आला आहे. यावर्षी ६४ चित्रपट, २७ व्यावसायिक नाटकं, २७ प्रायोगिक नाटकं व ९ पुनरुज्जीवित नाटकं या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत दाखल झाली.

झी गौरव पुरस्कार सोहळा शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी प्रसारीत होईल.

मोहन आवटे चित्रपटाची म्युझिक आणि वेब-साईट लॉंच


मोहन आवटे चित्रपटाची म्युझिक आणि वेब-साईट एका दिमाखदार सोहळ्यात कोहिनुर हॉल, मुंबई येथे मंगळवारी लॉंच झाली.


कलाकार
संजय नार्वेकर
सिया पाटील
विनय आपटे
अशोक शिंदे
कमलाकर सातपुते

सुभाश काळे - दिग्दर्शक, कथा
अनिरुद्ध काळे - निर्माता, पार्श्व-संगित, पटकथा
अनिल झेवियर - छायाचित्रण
फुलवा खामकर - नृत्य - दिग्दर्शक

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...