अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
अभिनेत्याच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत आलेला सुनील बर्वे नव्याने आणत असलेले ‘हमिदाबाईची कोठी’ नाटक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. या नाटकाचे हक्क तहहयात आपल्याकडेच असल्याचा दावा निर्माता उदय धुरत यांनी केल्याने सुनील बर्वे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ या नावाने पाच जुन्या कलाकृती रंगमंचावर आणून त्यांचे प्रत्येकी 25 प्रयोग करणार, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली आहे. यातील ‘सूर्याची पिल्ले’ आणि ‘लहानपण देगा देवा’ ही दोन नाटके नव्या संचात रंगभूमीवर आली आणि त्यांना जोरदार यशही मिळाले. अनिल बर्वेलिखित ‘हमिदाबाईची कोठी’ हे या मालिकेतील तिसरे नाटक ‘लहानपण देगा देवा’च्या पंचविसाव्या प्रयोगानंतर प्रेक्षकांसमोर याबाबत घोषणा होईल, असे कळते. एका वेश्येच्या जीवनावर आधारित हे नाटक 1979 मध्ये उदय धुरत यांच्या ‘माऊली प्रॉडक्शन’ने रंगमंचावर आणले होते. विजया मेहता दिग्दर्शित या नाटकातून नाना पाटेकरांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अत्यंत गाजलेल्या या नाटकात नीना कुलकर्णीही होत्या. त्याचे 250 प्रयोग झाले होते.
ते चंद्रकात कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली नव्याने आणण्यासाठी सुनील बर्वे यांनी रिहर्सलही सुरू केली असून अनिल बर्वे यांच्या पत्नी प्रेरणा यांच्याकडून रीतसर हक्क घेऊनच हे नाटक करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘उदय धुरत यांनी अनेक वर्ष ते नाटक केलेले नाही. त्यांच्याकडे नेमके कोणते हक्क आहेत, हे ठाऊक नाही. पण हे प्रकरण सामोपचाराने सोडवायचे आहे. धुरत यांना भेटून त्यांची समजूत घालू,’’ असेही बर्वे म्हणाले. दुसरीकडे धुरत म्हणतात की, ‘‘हमिदाबाईची कोठी’चे हक्क तहहयात माझ्याकडे आहेत. नाटक रंगभूमीवर आले तेव्हाच लेखक अनिल बर्वे यांच्याकडून मी ते घेतले आहेत. त्यांना नाटकाचा पेन मनीही दिला आहे. तो दिल्यावर नाटक निर्मात्याचे होते. त्यामुळे दुसरा कुणी निर्माता हे नाटक करत असल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ.’
कॉपीराइट कायद्यानुसार एखाद्या निर्मात्याने पाच वर्षे नाटकाचे प्रयोग केले नसतील, तर नाटककार ते दुस-या निर्मात्याला देऊ शकतो. परंतु हा कायदा 1995 मध्ये आल्याने त्यापूर्वीच्या आलेल्या नाटकांना लागू होत नाही. त्यामुळे ‘हमीदाबाईची कोठी’ या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. याच मुद्दय़ावर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे लेखक प्रदीप दळवी यांच्याविरोधात खटला जिंकला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment