गुडनाईट प्रस्तुत 'झी गौरव' पुरस्कार २०११ साठीची नामांकने ’ग्रॅड हयात’ ह्या पंचतारांकित हॉटेल मधे जाहिर करण्यात आली.
'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाने एकूण १३ नामांकने पटकावून बाजी मारली. तसेच व्यवसायिक नाटकांमध्ये 'नवा गडी नवं राज्य' ने सर्वाधिक म्हणजे आठ नामांकने मिळवली आहेत.
स्पर्धेत 'मी मन आणि ध्रुव', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'मुंबई पुणे मुंबई' तसेच 'पारध' हे चित्रपट तर व्यवसायिक नाटकांमध्ये 'वा गुरु', 'काटकोन त्रिकोण', 'कथा', 'काय डेंजर वारा सुटलाय' आणि 'मीटर डाऊन' आहेत.
प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धेत 'पुनःश्च हनिमून' सात नामांकनासह आघाडीवर आहे तर 'जा खेळायला पळ', 'रात्रंदिन आम्हा', 'तिची सतरा प्रकरणे' या नाटकांनी प्रत्येकी सहा नामांकने मिळवली आहेत.
या पुरस्कारासाठी जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१० पर्यंतच्या कालावधीत प्रदर्शित झालेले चित्रपट आणि नाटक यांचा विचार करण्यात आला आहे. यावर्षी ६४ चित्रपट, २७ व्यावसायिक नाटकं, २७ प्रायोगिक नाटकं व ९ पुनरुज्जीवित नाटकं या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत दाखल झाली.
झी गौरव पुरस्कार सोहळा शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी प्रसारीत होईल.
No comments:
Post a Comment