संगीतकार यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या 'जगण्यात मजा आहे' या मराठी रोमॅन्टिक गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते आणि संगीतकार यशवंत देव व सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, संगीतकार नंदू होनप, चित्रपट निर्माते अतुल काळे, सुमीत कॅसेटचे सुभाष परदेशी, ख्यातनाम गायक अरुण दाते, बुजुर्ग संगीतकार प्रभाकर जोग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला.
मोघे म्हणाले, 'महाराष्ट्रात भावसंगीताची मोठी परंपरा आहे. चांगले काव्य हे लोकप्रिय होतेच, असे नाही आणि लोकप्रिय असलेली गाणी तीही चांगल्याच काव्य प्रकारात मोडतातच असेही नाही. प्रत्येक काव्याचे, त्याला लावलेल्या चालीचे एक नशीब असते. गाणे आणि काव्य ही एक कला असल्याने ती अपूर्ण असणारच. पण गायकांनी ही कला समजून घेऊन त्या काव्याचा अर्श समजून घेऊन काव्य गायले तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला परिणाम होईल.'
या सोहळ्यात अल्बममधली काही गीते जीतेंद्र अभ्यंकर आणि स्वरजा लेले यांनी साद्र केली. या अल्बमसाठी गीत लेखन केलेले कवी - गीतकार राजन लाखे, सुमीतचे सुभाष परदेशी हेही या सोहळ्यास उपस्थित होते.
'जगण्यात मजा आहे' या अल्बमम्ध्ये एकूण ८ गाणी आहेत. यातली गीतरचना राजन लाखे यांची असून त्यांना यशवंत देव यांनी संगीत दिलं आहे.
No comments:
Post a Comment