Monday, February 21, 2011

'तूच खरी घरची लक्ष्मी’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण


सुदत्त फिल्मस्‌ बॅनर अंतर्गत हर्षल भदाणे निर्मित आणि विजय भानू दिग्दर्शित ’तूच खरी घरची लक्ष्मी’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चंद्रकलासारखा तमाशाप्रधान चित्रपट निर्माण केल्यानंतर एका संवेदनशील चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न भदाणे यांनी केला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या चित्रिकरण सत्राप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर विशेषत्वाने उपस्थित होते.

घराण्याला वंशज म्हणून मुलगाच हवा मुलगी नको असे मानणार्‍या कुटुंबांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे. मुलाची अपेक्षा करण्यार्‍या घरातील बाईच्या पोटात जर मुलीचा गर्भ असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळले तर गर्भपात करण्याचा सल्ला त्या होणार्‍या आईला दिला जातो. तीने तरीही मुलीला जन्म दिलाच तर तीने जणू काही मोठा अपराध केलाय, मोठे पाप केलेयं अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. सरकारने सोनोग्राफी आणि गर्भपातावर कायद्याने बंदी आणली असली तरीही काही ठिकाणी सोनोग्राफी करून गर्भपात केला जातो. या चित्रपटात हेच ठळकपणे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद बाबूराव बोरगांवकर यांचे असून, जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना अच्युत ठाकूर यांनी संगीत दिलेले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत सुनिल बर्वे, तेजा देवकर, आदिती सारंगधर, शरद पोंक्षे, रविंद्र बेर्डे, सुशांत शेलार, अंजली जोशी, आणि असित रेडीज.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...